नरजन्मामधिं नरा करुनि
नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी तरिच ही सार्थक मानवकुडीं बा चौर्यांशीं लक्ष वेळ संसार पडला गळां चिंतेचा पिकला मळा दारधनाचा लोभ टाकुनी झटकर हो वेगळा हा कसा उकलिशी पिळा धनानिमित्तें जनापुढें तूं दाविसि नाना कळा किति तुला मुलाचा लळा तूं पडुं नको यांचे भरीं तुझ्या हें खापर फुटतें शिरीं तुला मी गोष्ट सांगतों खरी आतां कर तांतडी ही पुन: न ये बा घडी