नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी ! जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम तिथे अन्न होऊन ठाकेल श्याम दिसे सावळे रूप त्याचे शिवारी ! नको मंत्र त्याला मुनीब्राह्मणांचे तया आवडे गीत श्वासां-घणांचे वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी ! शिळा फोडिती संघ पाथरवटांचे कुणी कापसा रूप देती पटांचे तयांच्या घरी नांदतो तो मुरारी ! जिथे काम तेथे उभा श्याम आहे नव्हे धर्म रे घर्म ते रूप पाहे असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी !