नात्यास नाव अपुल्या
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही व्यवहारकोविदांचा होईल रोष, होवो व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई ना तालराग यांच्या बंधात बांधलेला स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा? मंझिल की जयाची तारांगणात राही