नीज गुणिले नीज लवलाही
पुनवेच्या घरी निळी गोजिरी, निजली अंगाई नीज गुणिले नीज लवलाही तव नयनीच्या नक्षत्राला दृष्ट व्हायची या चंद्राची पुष्पदळे ही पापण्यांची, झणि लडिवाळे मिटुनी घेई निजली अंगाई लाजविणारी जाईजुईला करांगुलीची कोमलताही गोड कहाणी सांगून तीही अधुनीमधुनी देत जांभई निजली अंगाई सर्व सुखांची प्रेमळ जननी, हळूहळू येई निद्रामाई होऊन आता तुझीच आई, चुंबित राही वत्सलता ही निजली अंगाई