निळासावळा नाथ तशी ही
निळासावळा नाथ, तशी ही निळीसावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात तुडवुनी वन धुंडुनी नंदनवन शोधुनी झाले अवघे त्रिभुवन एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात नीलजळी यमुनेच्या साची होडी सोडिली मी देहाची गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासात