निंबोणीच्या झाडामागे
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई मीट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई