निरोप द्यावा बाळा आतां । टाकुनि जाते माता ॥ घटकेचा संसार संपला, लटका ठावठिकाणा । वनदेवींनो, पदरीं घ्या हा माझा राजसराणा ॥ अनाथ दुबळा देह पडे हा, आई नाहीं त्याला । काळ्या रातीं जित्या फुलांचा खडा पहारा ठेवा ॥ भुतें जागतां उठतां दचकुनि हृदयींचा हा ठेवा । फुलत्या फुलवंतीची यावर मायापांखर घाला ॥