PrintSource

निरोप तुज देता ऊर्मिला

Nirop Tuj Deta Urmila Mi

रमेश अणावकर

ऊर्मिला मी, निरोप तुज देता
जाउ नको तू वनी या क्षणी, सांगु कसे नाथा?

पितृवचनी रामामागुनी
चरण चालती निश्चय करुनी
बंधुप्रेम हे गहिवरुनीया मीच स्वये पाहता

रघुवंशातिल ज्या पुरुषाला
देव म्हणोनी मी पूजियला
वीर धनुर्धर त्या वीराची असता पतिव्रता

मुग्ध मनाची वेडी माया
दु:ख झेलुनी झिजते काया
त्या झिजण्यातच शतजन्मीचे भाग्य मला लाभता