ॐकारस्वरूपा सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥ नमो मायबापा गुरुकृपाघना । तोडी या बंधना माया मोहा ॥२॥ मोहोजाळ माझें कोण निरशील । तुजवीण दयाळा सद्गुरुराया ॥३॥ सद्गुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥ गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र-रवि ॥५॥ रवि शशि अग्नि नेणती ज्या रूपा । स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥६॥ एका जनार्दनीं गुरु परब्रह्म । तयाचें पैं नाम सदा मुखीं ॥७॥