ओंजळीत माझ्या माझे उसासे
ओंजळीत माझ्या माझे उसासे आणि भोवताली आभाळ भासे ! कंठात हुंकार परतून गेले तळव्यात अश्रू किती वेचलेले कसे मीच माझे अवसान होते स्वप्नास माझ्या, माझे दिलासे आणि भोवताली आभाळ भासे ! दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा जगणेच आहे इथे साचलेले किती प्रश्न भवती आणि मन रिकामे कशाचे करावे स्वत:शी खुलासे आणि भोवताली आभाळ भासे !