पहा पहा काय सुंदर
पहा पहा काय सुंदर । दिसे शोभा वीर नरवर । नंदिकेश्वर पृष्ठीवर । आरुढला त्रिपुरांत कर हर ॥ हेमघंटा नाद घणघण । दोहिं भागीं सर्वही गण । नंदी भृंगी धरिति वेसण । उडविती वर छत्रचामरें ॥ शंख दुंदुभि डमरु वाजत । भूतांचा सरदार गाजत । आली स्वारी किती साजत । आज त्या बघतों नयनभरें ॥ नभीं दाटलीं सुरविमानें । पहाया तुज संभ्रमानें । कुसुम वर्षति अती मानें । बलवंता हर्ष निर्भर ॥