पहा टाकले पुसुनी डोळे
पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका ! झडे दुंदुभी, झडे चौघडा रणरंगाचा हर्ष केवढा ! एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका ! शकुनगाठ पदरास बांधुनी निरोप देते तुम्हा हासुनी आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका ! या देशाची पवित्र माती इथे वीरवर जन्मा येती तोच वारसा तुम्ही पोचवा येणार्या शतका !