पहाट झाली उठा उठा
एकामागून एक उजळती, आकाशाच्या रंगछटा पहाट झाली उठा उठा नारी चालल्या लगबग पायी कुणी खांद्यावर कावड वाही जलभरणाची एकच घाई, झरे राहिले पैलतटा पशुपक्षीगण झाले जागे गाव हळूहळू उजळू लागे मंदिरातला सेवक सांगे, भावभक्तीची फुले लुटा