PrintSource

पहाटेच्या या प्रहरी

Pahatechya Ya Prahari

ग. दि. माडगूळकर

पहाटेच्या या प्रहरी
म्हणा हरि हरि हरि

रात्र शेवटाला गेली
उखा आभाळी उदेली
फुलारली झाडे-वेली
जाग वारियासी आली
वेळ शीतळ साजिरी
पक्षी गाती नानापरी

गेला दिस नाही येत
काही करावे संचित
साधा आपुलाले हित
नाम वाचे उच्चारित
नाम घेता घरीदारी
उभा विठ्ठल कैवारी

सरे अंधाराचा पाश
झरे मोकळा प्रकाश
मुखे करा नामघोष
जाति जळोनिया दोष
तुका ह्मणे जन्मावरी
ठेवा तुळस-मंजिरी