पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे, माये सांगताहे ॥१॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी । जिवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥ ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥