पैठणी बिलगुन म्हणते मला
पैठणी बिलगुन म्हणते मला जानकी वनवास ग संपला हर्षिता होऊनिया सुंदरी वल्कले फेकुन दे तू दुरी गोजिरा गजरा माळून शिरी लाव तू भाळी कुंकुम-टिळा पाहुनी रूप तुझे देखणे जाहली लज्जित ही भूषणे पतिप्रेमाचे उधळित हे सोने प्रीतीचा दिवाळसण तो आला