Back
Fitting…

1 page

पांखरा गीत नको गाऊ

पांखरा, गीत नको गाऊ !
कातरवेळी आतुर जीवा
वेध नको लावू;
पांखरा, गीत नको गाऊ !

शब्दाहुन तव सूर बोलके
कानी येता काळिज चरके
विरहाचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू?
पांखरा, गीत नको गाऊ !

रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा?
त्या प्रीतीच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ
पांखरा, गीत नको गाऊ !

पांखरा गीत नको गाऊ

पांखरा, गीत नको गाऊ !
कातरवेळी आतुर जीवा
वेध नको लावू;
पांखरा, गीत नको गाऊ !

शब्दाहुन तव सूर बोलके
कानी येता काळिज चरके
विरहाचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू?
पांखरा, गीत नको गाऊ !

रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा?
त्या प्रीतीच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ
पांखरा, गीत नको गाऊ !

पांखरा गीत नको गाऊ

पांखरा, गीत नको गाऊ !
कातरवेळी आतुर जीवा
वेध नको लावू;
पांखरा, गीत नको गाऊ !

शब्दाहुन तव सूर बोलके
कानी येता काळिज चरके
विरहाचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू?
पांखरा, गीत नको गाऊ !

रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा?
त्या प्रीतीच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ
पांखरा, गीत नको गाऊ !