पक्ष्यांचे लक्ष थवे
पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे वार्यावर गंधभार भरलेले ओचे झाडांतुन लदबदले बहर कांचनाचे घन वाजतगाजत ये- थेंब अमृताचे सोन्याची अंबारी, सोन्याचे इंद्रधनू धरतीवर मृदुल पाय उतरले कुणाचे तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे पक्ष्यांचे लक्ष थवे