पंढरीचे जन अवघें
पंढरीचे जन अवघें पावन । ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥ विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें । विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥ विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥ नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें । विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥