पंढरींचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥