Back
Fitting…

1 page

पंख जरी जळलेले

पंख जरी जळलेले नील नवे पाहीन मी
मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी

काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे
किरणांच्या स्पर्शाने पक्ष्याला कंठ फुटे
राखेतुन उंच उडून गगनशिरी जाईन मी

मी म्हटले ईश्वरास जळताना ज्वालांवर
नाचणार नाही मी सबळांच्या तालावर
अक्रोशत एकाकी विजनातच राहीन मी

धडधडून प्रलयाग्‍नी आला जर घेत घास
निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेतरास
शेवटला उंच सूर मुक्तीला वाहिन मी

पंख जरी जळलेले

पंख जरी जळलेले नील नवे पाहीन मी
मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी

काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे
किरणांच्या स्पर्शाने पक्ष्याला कंठ फुटे
राखेतुन उंच उडून गगनशिरी जाईन मी

मी म्हटले ईश्वरास जळताना ज्वालांवर
नाचणार नाही मी सबळांच्या तालावर
अक्रोशत एकाकी विजनातच राहीन मी

धडधडून प्रलयाग्‍नी आला जर घेत घास
निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेतरास
शेवटला उंच सूर मुक्तीला वाहिन मी

पंख जरी जळलेले

पंख जरी जळलेले नील नवे पाहीन मी
मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी

काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे
किरणांच्या स्पर्शाने पक्ष्याला कंठ फुटे
राखेतुन उंच उडून गगनशिरी जाईन मी

मी म्हटले ईश्वरास जळताना ज्वालांवर
नाचणार नाही मी सबळांच्या तालावर
अक्रोशत एकाकी विजनातच राहीन मी

धडधडून प्रलयाग्‍नी आला जर घेत घास
निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेतरास
शेवटला उंच सूर मुक्तीला वाहिन मी