परब्रह्म भेटीलागी
परब्रह्म भेटीलागी धरेवरी आले सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले