PrintSource

परी म्हणू की सुंदरा

Pari Mhanu Ki Sundara

गुरु ठाकूर

परी म्हणू की सुंदरा, तिची तर्‍हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणू निघाली

तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली

हजारदा ती भेटते, बोलू बोलू वाटते
बोलणे मनातले परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली