पतंगा जशी ओढ
पतंगा जशी ओढ ज्योतीकडे तशी प्रीत माझी तुझ्याशी जडे जशी धाव घेते नदी सिंधुपाशी तसे वेड तुझे मनाला जडे इथे कंटकांनी मला वेढिली तुला गंधवार्ताही ना लाभली न साही जीवा भार या सौरभाचा कधी भृंग धावेल माझ्याकडे? सदा भास वेडावतो गे तुझा अशी का दुरुनीच देशी सजा इथे कंकणांचा, इथे पल्लवांचा करी सुन्न कल्लोळ चोहीकडे