PrintSource

पाठ शिवा हो पाठ शिवा

Patha Shiva Ho Patha Shiva

ग. दि. माडगूळकर

पाठ शिवा हो पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा

बन केळीचे हरित सापळे
लपायास मज असे मोकळे
प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा?

नूपुर विरहित जरी तव पाऊल
अचुक मला पण लागे चाहूल
कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा

उमटु न देईन साद पाउली
सरकन जाईन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद हा रंभांचा उभा थवा

सावली होशील, परि कशाची?
तुझ्या रूपाची, तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे? दोन जिवांचा जडे दुवा