पत्र तुझे ते येता अवचित
पत्र तुझे ते येता अवचित लाली गाली खुलते नकळत साधे सोपे पत्र सुनेरी नकळे क्षणभर ठेवु कुठे मी शब्दोशब्दी प्रीत हासरी लाज मनाला, मी शरणागत आजवरी जे बोलु न शकले शब्दांवाचुन तू ओळखिले गीत लाजरे ओठांवरले गुणगुणते मी नयनी गिरवित वेळीअवेळी झोपेमधुनी जागी होते मी बावरुनी खुळ्या मनीचा भास जाणुनी गुज मनीचे हृदयी लपवित