पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू ! गरगर गिरकी घेते झाड धडधड वाजे दार कवाड अंगणातही बघताबघता पाणी लागे साचू ! अंगे झाली ओलीचिंब झुलू लागला दारी लिंब ओली नक्षी पाऊसपक्षी कुणी पाहतो वाचू ! ओसरुनी सर गेली रे उन्हे ढगांतुन आली रे इंद्रधनुष्यामध्ये झळकती हिरे माणके पाचू !