पाऊस कधींचा पडतो झाडांची हलती पानें; हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुरानें. डोळ्यांत उतरतें पाणी पाण्यावर डोळे फिरती; रक्ताचा उडला पारा.. या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला? तार्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा; माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा !