पावसात नाहती लता लता
पावसात नाहती लता लता कळ्या फुले सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले शांत शांत आसमंत, शीत वात धावतो अंग अंग चिंब हो चुकार थेंब चावतो घे कुशीत आसरा, जवळ येई प्रेमले हाच योग ना सखे तू मनात ठेवला आयता घरातळी मिठीत चंद्र गावला कोटरात पक्षीही असेच आज झोपले पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते सौख्य सहज लाभता भीती आत दाटते गारठ्यातही उगा का कपोल तापले