पायावरी प्रियाच्या सर्वस्व
काया जरी निमाली का प्रीत ओसरेल? छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी ! प्रीतीसवे हसावे प्रीतीसवे रुसावे प्रीतीशिवाय काही डोळ्यांस ना दिसावे त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची ज्योतीवरी पतंग पंखांस दाहणारी