फार नको वाकूं जरी उंच बांधा; फार नको झाकूं तुझा गौर खांदा. आणि गडे डोळे तुझे फार फंदी, साज तुझा आहे जुईचा सुगंधी. चित्त मऊ माझें जशी रानकळी : धुंद तुझी आहे नदी पावसाळी. श्वास तुझेमाझे जसा रानवारा, प्रीत तुझीमाझी जसा सांजतारा.