PrintSource

फूलपाखरू झालो रे मी

Phoolpakharu Jhalo Re Mi

जगदीश खेबूडकर

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !
फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !

मऊमऊ माझ्या पंखांची नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडेतिकडे दंवबिंदूंनी न्हालो

फुलाफूलावर बसतो मी, खुदकन गाली हसतो मी
डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो

नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे
क्रूरपणा हा बघुनी तुमचा मनोमनी मी भ्यालो