पोटापुरता पसा पाहिजे
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ! हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी ! महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया गरजेपुरती देई वसने जतन कराया काया गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ! सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा, रंक करी वा राजा अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !