प्रभु तू दयाळू
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता दया मागतो रे तुझी मी अनंता जगविण्यास देहा दिली एक रोटी नमस्कार माझे तुला कोटी कोटी वासना कशाची नसे अन्य चित्ता तुझ्या पावलांशी लाभता निवारा निघे शीण सारा मिळे प्रेमधारा सर्व नष्ट होती मनातील खंता ज्ञान काय ठावे मला पामराला मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा तुझे नाम ओठी नको वेद-गीता