प्रार्थना देवा तुला ही, तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा दुःख जेव्हा दाटूनिया भार होतो अंतरी मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरूडापरी संकटांशी झुंजण्याला हात दे मजला दहा स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी देह हा कर्मात सरुनी, सफल होवो जन्म हा