PrintSource

प्रथम करा हा विचार

Pratham Kara Vichar

गो. ब. देवल

प्रथम करा हा विचार पुरता ।
आवरोनि ममता ॥

धनाढ्य आपण मान्य कुळींचे ।
हीन कुळींची मी मज वरितां ॥

करितिल निंदा हसतील सारे ।
जाति धर्म कुलहि अवगणितां ॥

लग्‍नगांठही पडे एकदां ।
नये पुन्हां कधिं ती सोडिवतां ॥