PrintSource

प्रीत रंगली ग

Preet Rangali Ga Kashi

श्रीकृष्ण पोवळे

प्रीत रंगली ग कशी राजहंसी

अग बाई ग लाजली हंसी,
बोले ना ती तुझ्याशी !

तुझिया कपोली प्रीत रंगली ग
लाजून हसली, बघ इकडे ग
धरिसी कशाला पदर उराशी
तुझी रे हंसी, फसली कैसी, पडली पाशी,
धीट किती हा रमण विलासी,
बोले ना तुझ्याशी !

रुसली राणी, डोळां पाणी, हास्य आननी
नजर तुझी घे थरथरणारी वरती जराशी
गोड बोलुनी, प्रेम दावुनी, हृदय जिंकुनी,
जाल सोडुनी, कुठे दूर देशी,
बोले ना तुझ्याशी !