प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी पुन्हांपुन्हां हिणवुनी तुला ग हसतिल ना मैत्रिणी सवें प्रीतिची ज्योती उजळूं सवेच प्रीतीलहरी उधळूं प्रसन्नतेनें निवांत खेळूं प्रीतीच्या अंगणी चंदेरी रात्रीं जाउनिया कांठावरुनी पाहूं दरिया देईल सोबत येऊन उदया शुक्राची चांदणी अपुल्या प्रीतीची ग द्वाही फिरवूं नको इतुक्यांत कुठेही उघडपणे मम गुणगौरवही करूं नको साजणी