प्रेमपिसें भरलें अंगीं
प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतेछंदे नाचों रंगीं ॥१॥ कोणे वेळे काय गाणें । हें तों भगवंता मी नेंणे ॥२॥ वारा धांवे भलतया । तैसी माझी रंग छाया ॥३॥ टाळमृदंग दक्षिणेकडे । आह्मी गातों पश्चिमेकडे ॥४॥ बोले बाळक बोबडें । तरी तें जननीये आवडे ॥५॥ नामा ह्मणे गा केशवा । जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥