प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात? आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनांत मनासारखी मिळे सहचरी, फुलून दरवळे सुख संसारी नकळे केव्हा येतीजाती दिवस आणखी रात तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात मोहरलेल्या या ऐक्यावर, एक होतसे नवखी थरथर दिसण्यावाचून जाणवते मज नवल आतल्या आत