प्रियतम दर्शन देई
प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही कमळ जळाविण, शशीविण रजनी तशी बावरी तुजविण सजणी रात्रंदिन व्याकुळ भटकते विरह काळजा जाळी दिवसा भूक न रात्री निजणे ओठ विसरले सर्व बोलणे काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई हृदयेश्वर, का मज कष्टविसी भेट एकदा सदया मजसी जन्मजन्मींची मीरा दासी पडते तुझिया पायी