प्रिये पहा रात्रींचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥ थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत । दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥ पक्षि मधुर शब्द करिति । गुंजारव मधुप वरिति । विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥ सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया । स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥