प्रिये ये निघोनी (२)
नको ओढ लावून घेऊ उन्हाची
जसे पारधी हे तसे तीर टोची !
पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती
भरारी पडे मृत्तीकेशीच अंती !!
तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या
पदांशी भूमी तप्त होतीच माझ्या
परंतु तुझे हात हातात आले
व्यथांचे तळे गा नीळेशार झाले !
न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची..
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची !
फुला या उन्हाचा तुला ठाव नाही
बरे तप्तदेशी तुझा गाव नाही !
म्हणोनि तुझे ओठ गातात ओले
तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोले
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे..