पुजा हो दत्तगुरु दिनरात
पुजा हो दत्तगुरु दिनरात सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो दत्तगुरु पूजनात ब्रह्माविष्णूसवे महेश्वर त्रैमूर्तीचे रूप मनोहर अनसूयेच्या सदनी भूवर रमले आनंदात श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी सदा कृपेची करिती वृष्टी भक्तजनांच्या पाठीवरती फिरवी कोमल हात प्रसन्न होउनी दत्तदिगंबर उद्धरती हे सर्व चराचर अत्रिनंदन करुणासागर नित्य असो स्मरणात