PrintSource

पुन्हा न येईल वेळ

Punha Na Yeil Vel

पी. सावळाराम

अरे मोहना
वरचेवर का जमतो ऐसा मी
पुन्हा न येईल वेळ कधी ही
पुन्हा न येईल वेळ सख्या ही
पुन्हा न येईल वेळ

आज वाहते पाणी झुळझुळ
घे पिउनी भरभरुनी ओंजळ
परतुनी जेव्हा केव्हा येशिल
अरे कदाचित रिता कोरडा
आढळेल ओहोळ

सूर लागला खिळले लोचन
जुळल्या तारा उचंबळे मन
फुले चांदणे पसरी मोहन
अरे मोहना, वरचेवर का
जमतो ऐसा मेळ

अधीर व्याकुळ श्वास विलंबित
अधर पाकळ्या झाल्या विगळित
आतुरतेने काया कंपित
नको बुजू रे घे सावरुनी
ही झुकलेली वेल