पुण्य परउपकार पाप ते
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तो ची धर्म, असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥२॥ गति तेचि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥३॥ संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥४॥ तुका ह्मणे उघडें आहे हित घात जया जें उचित करा तैसें ॥५॥