तार वाजे काळजाची
तार वाजे काळजाची ओवी सुचे ज्ञानेशाची आभाळाच्या कागदाची सीमा झाली इंद्रायणीचे वेल्हाळ झुरुमुरू वाहे जळ लाट होउनी निर्मळ ओवी आली समाधीस टेके माथा चंद्र वेचिला मी हाता जणू सूर्यासही नवी प्रभा आली काळजाच्या अक्षराला स्पर्श अमृताचा झाला जणू मुक्या प्रतिभेला वाचा आली