PrintSource

तांडा चालला रे गड्या

Tanda Chalala Re Gadya

जगदीश खेबूडकर

तांडा चालला रे गड्या तांडा चालला
आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला

एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडूया
मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडूया
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला

वनवासी जिणं हे जल्माला लागलं
दु:खाचं काटंकुटं ठाई ठाई पेरलं
कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला

हिरवळीचा बिछाना, धुक्याची रे वाकळ
रात कधी संपली, कधी झाली सकाळ
माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला