टप टप टप टाकित टापा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा ! उंच उभारी दोन्ही कान ऐटित वळवी मान-कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा ! घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबुक ओढा ! सात अरण्ये समुद्र सात ओलांडिल हा एक दमात आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !