तशी जागा निवार्याला कुठे माझ्या घरी होती? पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती ! अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे, तुम्ही हासाल, ही माझी कधीची खातरी होती ! सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा, तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती ! मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे- 'तुला संधी जगायाची मिळालेली बरी होती !' जिथे गेलो, तिथे माझी नद्यांनी कौतुके केली.. कधी इंद्रायणी होती ! कधी गोदावरी होती ! अरे, ह्या जिन्दगानीची कधी मी काळजी केली? मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती !